Ad will apear here
Next
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या आयपीओची  घोषणा करताना एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद बर्वे आणि अध्यक्ष दीपक पारेख
मुंबई : एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचा प्राथमिक समभाग विक्री योजना (आयपीओ) येत्या २५ जुलैला विक्रीसाठी खुला होत आहे.तो २७ जुलैपर्यंत खुला असेल.

 याद्वारे प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन कोटी ५४ लाख ५७ हजार ५५५ समभागांची विक्री करण्यात येणार आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ८५ लाख ९२ हजार ९७०पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची आणि स्टँडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडतर्फे एक कोटी ६८ लाख ६४ हजार ५८५  समभागांची ऑफर फॉर सेलद्वारे रोख पद्धतीने विक्री केली जाणार आहे. 

ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर एक हजार ९५ रुपये ते अकराशे रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण १३ इक्विटी शेअर्स असून, त्यानंतर १३ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.

ऑफरसाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, डीएसपी मेरिल लिंच लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सीएलएसए इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, आयआयएफएल होल्डिंग्स लिमिटेड, जेएम फिनान्शिअल लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ली इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड व नोमुरा फिनान्शिअल अॅडव्हॉयजरी आणि सिक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZPKBQ
Similar Posts
हिंदकॉन केमिकल्सच्या आयपीओला १३२ पट मागणी पुणे : विविध रासायनिक उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सक्रिय असलेल्या हिंदकॉन केमिकल्स लिमिटेडच्या समभागाची नुकतीच एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली. या समभाग विक्रीला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या समभागाची मागणी १३२ पट अधिक झाली.
‘आवास’च्या प्रारंभी समभागाची विक्री २५ सप्टेंबरपासून मुंबई : आवास फिनान्शिअर्स लिमिटेडतर्फे २५ सप्टेंबर २०१८पासून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरची प्रति इक्विटी शेअर प्राइसनुसार (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री केली जाणार आहे. यामध्ये चार हजार दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १६,२४९,३५९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे
सेन्सेक्सची विक्रमी उच्चांकाला गवसणी मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) दोन एप्रिल २०१९ रोजी इतिहासात प्रथमच ३९ हजारांचा सार्वकालिक उच्चांकी टप्पा पार करून तो टिकवून ठेवण्यात यश मिळवले. याआधी २९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने ३८ हजार ९८९पर्यंत झेप घेतली होती. त्यानंतर दोन एप्रिल २०१९ रोजी सेन्सेक्सने ३९ हजारांचा आतापर्यंतचा विक्रमी उच्चांक गाठण्यात यश मिळवले
‘भारत डायनॅमिक्स’चे समभाग १३ मार्चला खुले मुंबई : भारत डायनॅमिक्स लिमिटेडने (कंपनी किंवा जारीकर्ता) १३ मार्च २०१८ रोजी प्रमोटर, भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालय, भारत सरकार (विक्रीदार समभागधारक) यांच्यामार्फत विक्री बोलीच्या माध्यमातून २२, ४५१, ९५३ समभाग खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीने ४५८,२०३ समभाग पात्र कर्मचाऱ्यांमध्ये वितरण करण्यासाठी राखून ठेवले आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language